---Advertisement---

एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाचा टोला, म्हणाले ‘तुम्ही ऑपरेशन..’

---Advertisement---

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ प्रचंड तापलं आहे. असा एकही दिवस जात नसेल की कोणी कुणावर टीका करत नसेल. रोजच एकमेकांवर आरोप, टीका केली जात असून पुन्हा ठाकरे गटाने शिवसेना नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

नेमकी बातमी काय?
डी वाय पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी मी डॉक्टर होतो छोटे मोठे ऑपरेशन मी केले आहेत, असे एकनाथ शिंदे कार्यक्रमात म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

काय म्हणाले संजय राऊत?
डॉक्टरेट वैगरे आम्हाला सांगू नका. तुम्ही ऑपरेशन करत राहा आम्ही मुका मार देतो. डॉक्टरकी महाराष्ट्रात पायलीला पन्नास मिळत असतात. प्रत्येक भ्रष्टाचाराला डॉक्टरेट मिळते हा देशाचा अनुभव आहे, त्यामुळे डॉक्टरांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. एकनाथ शिंदे डॉक्टर झाले असतील पण त्यांनी आधी स्वत:वर शस्त्रक्रिया करावी, असे संजय राऊत म्हणाले.  बदल्याचे राजकारण सुरू आहे. बदला घेण्यासाठी नरेंद्र मोदी ते अदानीला का वाचवत आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---