Eknath Shinde’s health deteriorates : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही मात्र शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच एकनाथ शिंदेची प्रकृती खालावल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहतात की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या चार दिवसांपासून आजारी आहेत. शिंदे आज मंगळवारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शिंदे यांना काय होतोय त्रास ?
एकनाथ शिंदे यांचा ताप कमी-जास्त होत आहे. त्यामुळे अंगामध्ये कणकण आहे. घशातही इन्फेक्शन असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या. डेंग्यू आणि मलेरियाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या पेशी कमी जास्त होत असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना थेट रुग्णालयातच दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शिंदे रुग्णालयात दाखल झाले आहेत. ज्युपिटर रुग्णालयात शिंदेंवर उपचार सुरु आहेत.