---Advertisement---

बसच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार; ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर

---Advertisement---

अमळनेर । अमळनेर तालुक्यातील देवगाव- देवळी गावानजीक भरधाव बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. भानुदास पुंडलिक पाटील (वय ६४, रा. खाचणे, ता चोपडा) असे मृत व्यक्तीचे नाव असून याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

खाचणे येथील भानुदास पुंडलिक पाटील हे कामानिमित्त दुचाकीने अमळनेरकडे जात होते. या दरम्यान देवगाव- देवळी फाट्याजवळ चोपड्याहून बदलापूरकडे जाणाऱ्या बसचालकाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात भानुदास पाटील रस्त्यावर दूरवर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर
बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कुटुंबातील करता व्यक्ती गेल्याने ऐन दिवाळी सणाच्या उत्सवात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान भानुदास पाटील यांच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बसचालक शेख मिनाजोद्दीन जहिरोद्दीन (रा. अडावद, ता. चोपडा) याच्याविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार सुनील पाटील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment