---Advertisement---
leopard attack in Devgaon : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना देवगाव शिवारात घडली असून, इंदुबाई वसंत पाटील असे वृद्ध महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय व वैद्यकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुबाई वसंत पाटील (वय ६०) या देवगाव शिवारातील शेतात काम करीत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक पाठीमागून हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यात इंदुबाई यांना डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या.
त्यांना ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा शासकीय व वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय व वैद्यकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देवगाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यातच आज अचानक इंदुबाई यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.