Election : जळगाव जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. 23 जानेवारी रोजी नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या पुरूष व महिला मिळून 34 लाख 91 हजार 98 मतदार आहेत. यात सुमारे ऐंशी हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 2019 लोकसभा निवडणूकीत 3559 मतदान केंद्र होती. या निवडणुकीत 5 मतदान केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या 3 हजार 564 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवार, 23 रोजी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित होते.
जिल्ह्यात शहरी भागात 1 हजार 69 व ग्रामीण भागात 2 हजार 495 मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात 430, ग्रामीण भागात 1 हजार 608 असे एकूण 2 हजार 38 ठिकाणे आहेत. याव्यतिरिक्त 14 ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात कारण त््यााठिकाणी मतदारांची संख्या 1500 च्या वर आहे. 1 हजार 782 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील 16 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही.
सध्याच्या जिल्ह्यात 9 हजार 339 बॅलेट युनिट, 5 हजार 450 कंट्रोल युनिट आणि 5 हजार 733 व्हीव्हीपीएटी मशिन उपलब्ध आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या 47 लाख 4 हजार 882 इतकी आहे. यात 34 हजार 91 हजार 98 मतदार संख्या आहे. मतदारांमध्ये 18 लाख 12 हजार 7 पुरूष तर 16 लाख 78 हजार 956 महिला मतदार आहेत. त्ृातीयपंथी 135 मतदार आहेत. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग 19 हजार 211 मतदार आहेत. 80 वर्षांवरील वयोमान असलेले 1 लाख 3 हजार 129 मतदार आहेत.
पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या गैरहजर मतदाराने सर्व तपशील भरून फॉर्म 12डी द्वारे संबंधित
मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. पोस्टल बॅलेट सुविधेची मागणी करणारे असे अर्ज निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेपासून संबंधित निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून पाच दिवसांच्या कालावधीत आरओकडे पोहोचले पाहिजेत.असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे.
दोन मतदान अधिकाऱ्यांचा समावेश असलेले मतदान पथक, एक व्हिडिओग्राफर आणि एक सुरक्षा व्यक्ती, मतदाराच्या घरी भेट देतात आणि मतदानाची संपूर्ण गुप्तता राखून मतदाराला पोस्टल बॅलेटवर मतदान करण्यास सांगतात. असे मतदार घरबसल्या मतदान करू शकतात. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा 72 टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत््ातर दर 1000 पुरुषांमागे 927 महिला असे आहे. यात सुधारणा झाली आहे. 27 ऑक्टोबर 2023 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत 18-19 वयोगटातील मतदारांची संख्या 16हजार 229 वरून 38 हजार 296 झाली आहे. 2022 पासून जिल्ह्यात एकूण 63 हजार 711 मतदारांची वाढ झाली आहे. 2 लाख 43 हजार 15 मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत, तर 3 लाख 6 हजार 726 मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. 23 जानेवारी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवीन निवडणूक फोटो ओळखपत्र 2 लाख 91 हजार 171 छापण्यात आले आहेत. टपाल विभागाकडून 2 लाख 36 हजार 11 निवडणूक छायाचित्र ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 55 हजार 160 कार्डचे लवकरच वितरण केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
राज्य निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी व मतदार जागृती कार्यक्रमाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तयारीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.