शरद पवारांची मोठी घोषणा! राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेलसह सुप्रिया सुळेंची निवड

मुंबई : आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा स्थापना दिवस आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शरद पवार यांनी आज शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फेरबदलांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली आहे.परंतु अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही.

नुकतेच शरद पवार यांनी पक्षप्रमुखपदाची जबाबदारी सोडण्याची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी आणि नेत्यांच्या समजूतीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. आता पक्षात दोन नवीन कार्याध्यक्ष करून हायकमांडने आश्चर्य व्यक्त केले आहे.

यादरम्यान, शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी सर्वांना काम करावे लागेल. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारिणीचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात येत असून सुप्रिया सुळे यांच्याकडे हरियाणा आणि पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे.

परंतु अजित पवार यांच्यांकडे काहीच जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांनी घोषणा केली तेव्हा अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

यांच्याकडे असणार या राज्यांची जबाबदारी
सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्षा. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवा, लोकसभा यांच्या समन्वयाची जबाबदारी.
प्रफुल्ल पटेल – कार्याध्यक्ष. मध्य प्रदेश, राजस्थान, गोव्याची जबाबदारी.
सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस. ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी.
नंदा शास्त्री – दिल्ली प्रदेशाध्यक्ष.
फैसल – तामिळनाडू, तेलंगणा, केरळची जबाबदारी.