Election Results 2023 : भाजपला प्रचंड बहुमत, “तीन राज्यात महाविजयाकडे”

आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. ट्रेंडनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. त्याचवेळी तेलंगणात काँग्रेसचा विजय होताना दिसत आहे. शिवराज सिंह चौहान यांचे सरकार जबरदस्त निकालांसह मध्यप्रदेशात पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. या निकालांनी भाजप खूश आहे. भोपाळ, जयपूर, रायपूरपासून दिल्लीपर्यंत जल्लोषाची तयारी सुरू आहे.