तरुण भारत लाईव्ह ।०४ फेब्रुवारी २०२३। सद्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे पेट्रोलची बचत होते, तसेच प्रदूषण सुद्धा कमी होते. या कारणांमुळे लोक इलेक्ट्रिक वाहन घेणे पसंत करतात हे लक्षात घेऊन ओकाया आपली येणारी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच लाँच करत आहे. या स्कूटर मध्ये आपल्याला कोणते फीचर्स मिळतात आणि ही स्कूटर नेमकं कधी लाँच होणार हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
ओकाया आपली येणारी इलेक्ट्रिक स्कूटर 10 फेब्रुवारी २०२३ ला लाँच करणार आहे. येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचं नाव फास्ट एफ ३ आहे. या स्कूटरचा रायडिंग रेंज १४०-१६० किमीच्या मधात आहे. या स्कूटर मध्ये तीन रायडिंग मोड आहेत. ईको, सिटी आणि स्पोर्टस,स्कूटरला 1200 वॅटची मोटर मिळते जी 2500 वॅट पॉवर जनरेट करते. स्कूटर 3.5 kWh लिथियम-आयन LFP बॅटरीद्वारे समर्थित आहे. बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी स्विच करण्यायोग्य तंत्रज्ञान देखील आहे.
या स्कूटरमध्ये राइडिंग मोड उपलब्ध नसला तरी एलईडी डेटाइम रनिंग लाइटसह हॅलोजन हेड लाइट उपलब्ध आहे. ही स्लो-स्पीड स्कूटर आहे त्यामुळे टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे. ओकाया फ्रीडमची एक्स-शोरूम किंमत 74,899 रुपये आहे. जे तुम्ही नवीन इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा एक उत्तम पर्याय असू शकतो.