मुंबई : ईलेक्ट्रिकल वाहन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ईलेक्ट्रिकल वाहनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून, या घोषणेचा ईलेक्ट्रिकल वाहन धारकांना मोठा फायदा होणार आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्याही ईलेक्ट्रिक असणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आपण इलेक्ट्रिक व्हेईकल बाबत आधी टॅक्स लावला नाही. ३० लाखांपर्यंतच्या गाड्यांना टॅक्स नाही, त्यावर ६ टक्के कर लावतोय. इलेक्ट्रिक वाहनांवरील तो टॅक्स मागे घेण्यात येईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ईलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री करण्याचे घोषित केले. तसेच, शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने इलेक्ट्रिक असतील, अशी घोषणाही त्यांनी केलीय.
शासकीय कार्यालयासाठी शक्य असेल त्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जातील, आमदारांना गाड्यांसाठी दिले जाणारे कर्ज केवळ इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.