---Advertisement---

स्मार्ट मीटर बसवा विना शुल्क, वीज वितरण कंपनीचे ग्राहकांना आवाहन

---Advertisement---

शहादा : वीज वितरण कंपनीकडून बदलण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांत अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. वीज मीटर बदलाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी शंका निरसन करण्याची गरज असल्याची अपेक्षा जागरूक वीज ग्राहकांनी व्यक्त केली आहे. मात्र, स्मार्ट मीटरचा निर्णय वरिष्ठांकडून घेण्यात आलेला असून, ज्या भागात वीज गळती व चोरी होते त्या भागात प्राधान्याने स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचे वीज मीटर बदलण्यात येतील, ते बदलताना ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. अशी माहिती शहादा विभागीय वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता युगलकिशोर केशव प्रसाद यांनी दिली.

शहादा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहर व तालुक्यातील वीज ग्राहक, उद्योजक, व्यापारी व पत्रकारांच्या बैठकीत प्रसाद बोलत होते. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश बागूल, सहायक शहर अभियंता पुष्पेन्द्र पाडवी उपस्थित होते. या बैठकीस मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे, ग्राहक मंचाचे प्रा. डी. सी. पाटील, नरेंद्र – पाटील, प्रदीप जैन, अजित साबद्रा, प्रा. नेत्रदीपक कुवर, रूपेश जाधव, विष्णू जोंधळे, हिरालाल रोकडे, हर्षल सोनवणे, युवा उद्योजक नीलेश कापडणे, विजय चौधरी आदींची उपस्थिती होती. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत विविध है. विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी वीज वितरण कंपनीकडून जुने व कालबाह्य विद्युत साहित्य व उपकरणे बदलून वीजपुरवठा अखंडित होण्यासाठी प्रयत्न करावेत. शहरातील मलोणी व विकास फिडरवरील विद्युत पुरवठा सुरळीत करावा. त्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे. ग्राहकांना देण्यात येणारे वीजबिल योग्य प्रकारे व निर्धारित वेळेत मिळावीत. शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करून वीजपुरवठा करावा, सौर ऊर्जा पॅनल बसवलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करावे. वीज वितरण कंपनीच्या स्थानिक समितीची पुनर्रचना करण्यात यावी. याशिवाय शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यावे.

यावेळी शहर व तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून ठेकेदारामार्फत बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. स्मार्ट मीटर बसवायला ग्राहकांचा विरोध नाही मात्र, चांगल्या स्थितीत असलेले मीटर बसवल्यानंतर स्मार्ट मीटरचे चार्जेस वसूल करण्यात येऊ नये. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत आलेल्या आदेशाची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---