नवी दिल्ली : ट्विटरचे मालक बनल्यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले आहेत. यावेळी त्यांनी अनवेरिफाइड यूजर्ससाठी ट्विट मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी केलेल्या नियमानुसार, वेरिफाइड यूजर्सना १०,००० ट्विट वाचण्याची संधी मिळेल पंरतू अनवेरिफाइड यूजर्सना फक्त १००० ट्विट पाहण्याची संधी मिळणार आहे. हा नियम तात्पुरता लागू करण्यात आला आहे.
नवीन नियमांबाबत, एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये आधी सांगितले की, “डेटा चोरी आणि सिस्टम मॅनिप्युलेशनच्या वाढत्या घटना पाहता आम्ही काही तात्पुरते नियम लागू केले आहेत. यामध्ये, वेरिफाइड यूजर्सना एका दिवसात जास्तीत जास्त ६ हजार ट्विट्स वाचता येणार आहेत. तसेच अनवेरिफाइड यूजर्सना एका दिवसात ६०० ट्विट्स आणि नवीन अनवेरिफाइड यूजर्स एका दिवसात जास्तीत जास्त ३०० ट्विट वाचू शकतील.
यानंतर मस्कने त्यांचे ट्विट रिट्विट केले आणि ट्विट वाचण्याची मर्यादा लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. ही मर्यादा वेरिफाइड यूजर्सना ८ हजार ट्विट , अनवेरिफाइड यूजर्ससाठी ८०० आणनि नवीन अनवेरिफाइड यूजर्ससाठी ४०० ट्विट असेल. मात्र यानंतर आता एका नव्या ट्विटमध्ये मस्कने व्हेरिफाईड युजर्सची मर्यादा १०,००० ट्विट केली आहे. तर अनवेरिफाइड यूजर्ससाठी मर्यादा १००० असेल आणि नवीन व्हेरिफाईड युजर्ससाठी मर्यादा ५०० ट्विट असेल.
ट्विटरचा हा नवीन नियम लागू झाल्यानंतर दि. १ जुलै रोजी संध्याकाळी ट्विटर जगभरात ठप्प झाले. त्यामुळे युजर्सना त्रासाला सामोरे जावे लागले. वापरकर्त्यांनी सांगितले की ते ट्विट पाहू शकत नाहीत. उलट, ‘ट्विट्स पुनर्प्राप्त करू शकत नाही’ असा संदेश पुन्हा पुन्हा दिसत आहे.दरम्यान ट्विटरवर ट्विट वाचण्याची मर्यादा निश्चित केल्यामुळे अनेक वापरकर्ते निराश दिसले. विशेषत: असत्यापित वापरकर्त्यांनी मर्यादा ओलांडल्याबद्दल तक्रार केली. ट्विटरवर #RIPTwitter देखील ट्रेंड करत आहे. ट्विटची मर्यादा संपल्यानंतर युजर्स इन्स्टाग्राम वापरत असल्याचे सांगत एका युजरने मेम शेअर केला आहे.