एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक भन्नाट फिचर आणले आहे. विशेषतः या नवीन फिचरच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांना नोकरभरतीसाठी नवीन भन्नाट फिचर उपलब्ध होणार असल्याने ते कंपन्यांना अधिक फायदेशीर ठरणार आहे.
काय म्हटलं आहे?
‘X’ (पूर्वीचे ट्विटर) कंपनीने या संदर्भातील केलल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने Hiring ची बिटा आवृत्ती लाँच करून एक नवीन सेवा सुरू करत आहे. याद्वारे कंपन्या X वर रजिस्टर कंपन्यांना नोकरभरतीची जाहिरात करता येणार आहे. ज्यामुळे अनेक व्यक्तींना नोकऱ्या मिळवणे सोपे होईल आणि कंपन्यांना योग्य कर्मचारी मिळतील. X च्या या नवीन हालचालीमुळे Linkedin ला आव्हान निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
एलन मस्क यांच्या ‘X’ या प्लॅटफॉर्मवर नवीन सुविधेचा लाभ फक्त रजिस्टर संस्थाच घेऊ शकतील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी या सर्व कंपन्या आणि संस्थांनी ‘X’ च्या (पूर्वीचे Twitter) ‘व्हेरिफाइड ऑर्गनायझेशन्स’चे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. या संस्था X हायरिंग बीटा प्रोग्रामसाठी साइन अप करू शकतात, असे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.
https://pbs.twimg.com/media/F4ZkBi8WkAAr4q_?format=jpg&name=small