नमस्ते म्हणत योगासनं करणारा रोबोट; वाचा इलॉन मस्कचा भन्नाट शोध

नवी दिल्ली : इलॉन मस्क यांनी टेस्ला आप्टिमस रोबोटचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. ह्या व्हिडीओमध्ये रोबोट योगासन करताना दिसत आहे आणि नमस्ते बोलत आहे. हा व्हिडीओ Optimus ची क्षमता दाखवण्यासाठी शेयर करण्यात आला आहे. हा रोबोट सहज वस्तू ओळखू शकतो.

टेस्लाचा ह्यूमनॉइड रोबोट व्हिडीओच्या अखेरीस ‘नमस्ते’ म्हणत योगासन करत आहे. ह्या रोबोटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टूलचा वापर करण्यात आला आहे, जो टेस्लाच्या ऑटोमॅटिक कार्समध्ये वापरण्यात आला आहे. Tesla ह्याला अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम म्हणजे ऑटोपायलट सिस्टम म्हणत आहे.

एलन मस्कची कंपनी Tesla ह्या रोबोटची लवकरच मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणार आहे. ह्याचे लाखो यूनिट्सची निर्मिती सुरु आहे. फीचर्स पाहता ह्यात २.३ किलो वॉटआवरचा बॅटरी पॅक मिळतो, जो ह्याला संपूर्ण दिवसाची एनर्जी देतो. हा टेस्लाच्या चिपवर चालतो आणि ह्यात कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi सह LTE चा सपोर्ट देखील मिळतो. याची किंमत सुमारे २०,००० डॉलर म्हणजे जवळपास १६.४२ लाख रुपये आहे.

Tesla Optimus ची मानवाकडून प्रेरणा घेऊन डिजाईन करण्यात आला आहे, त्यामुळे हा कोणतीही वस्तू सहज उचलतो मग तिचा आकार कोणताही असो. मस्कनं शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये Optimus हात आणि पाय दुमडू शकतो हे दिसत आहे. ह्यासाठी ज्वॉइंट इंकोडर्सचा वापर करण्यात आला आहे. ह्या रोबोटला न्यूरल AI लँग्वेज द्वारे एन्ड-टू-एन्ड ट्रेन करण्यात आलं आहे. टेस्लानं ह्या रोबोटची क्षमता वाढवण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.