विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक, राज्यपालांना ईमेल करुन केली ही मागणी

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल रमेश बैस  यांना ईमेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. या हॅकींग प्रकारामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.

ईमेल हॅक झाल्याची बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोमवारी दुपारी चार वाजता लक्षात आली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विधानसभा अध्यक्षांची सायबर सुरक्षा तोडणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

विधानसभा अध्यक्ष हे खूप मोठे संविधानिक पद आहे. विधासभा अध्यक्षांकडे अनेक गोपनिय व संवेदनशिल बाबी असतात. यामुळे त्यांचा मेल हॅक होण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु एकंदरीत विधिमंडळातील सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे.