तरुण भारत लाईव्ह । जळगाव : भारताच्या दूरसंचार विभागाकडून नागरिकांना आलेल्या एका मेसेजने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. स्मार्टफोन्सवर आलेल्या या संदेशामुळे विविध भागांतील नागरिकांना दहशत आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याला घाबरण्याचे कारण नाही. सध्या, कोणत्याही अशा धोक्यांचे वृत्त नाही आणि ही केवळ केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतलेली चाचणी होती. दूरसंचार मंत्रालयाने कथितरित्या जारी केलेले संदेश, सकाळी 10:20 वाजता मोबाईल फोनमध्ये आला. त्यानंतर सकाळी 10:25 आणि 10:31 वाजता या मॅसेजने देशासह महाराष्ट्रात मोठा धुमाकूळ घातला.
या संदेशांची सामग्री भारत सरकारकडून आपत्कालीन सतर्कतेच्या चाचण्या असल्याचे सूचित करते. यावर नागरिकांडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या मॅसेजमुळे घरबलेल्या नागरिकांकडून सरकारला अचानक अलर्टसाठी स्पष्ट स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे.