मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात जाहीर केले असून यात EMI चा हप्ता भरणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. म्हणजेच त्यांच्या EMI मध्ये कोणताही बदल केला नाही. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच तो 6.5% वर स्थिर ठेवला आहे. मात्र, महागाईबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनीही महागाईत भाज्यांच्या किमतीचे योगदान सांगितले आहे. RBI गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार, रेपो दर 6.5% वर कायम राहील. त्यांनी सांगितले की, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने रेपो दर 2.5 टक्क्यांनी वाढवून 6.5 टक्के केला आहे. पण यावेळी तसे करण्याची गरज नाही.
आरबीआय गव्हर्नरच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मजबूत आहे. बहुतांश कंपन्यांचा ताळेबंदही मजबूत स्थितीत आहे. एवढेच नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेतही सुधारणा झाल्याच्या बातम्या येत आहेत. FY24 साठी GDP वाढीचा अंदाज 6.5% वर कायम ठेवण्यात आला आहे. तथापि, ते म्हणाले की, जागतिक व्याजदर सध्या उच्चच राहतील. तसेच सरकारी खर्चाचा संदर्भ देत त्यात वाढ झाल्याचे सांगितले. तसेच रेपो दरात कोणताही बदल न करणे हे एक चांगले लक्षण असल्याचेही सांगण्यात आले.
भाज्यांच्या दरात महागाई निश्चितच वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवले जाईल. जेणेकरून देशातील जनतेला महागाईचा फटका सहन करावा लागणार नाही असेही ते म्हणाले.