भावनिक घटना : शिक्षणासाठी झटणाऱ्या सेवानिवृत्त गुरुजींचा शाळेतच अंत

---Advertisement---

 

यावल : तालुक्यातील एका गावात सर्वांना भावूक करणारी घटना घडली आहे. ही घटना दहिगाव येथील आदर्श विद्यालयात सोमवारी (१ सप्टेंबर ) रोजी घडली. या शाळेत 33 वर्षे अध्यापन करून 27 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले 85 वर्षीय एम. डी. नारखेडे (रा. कुशपूर, सध्या फैजपूर निवासी) हे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मांडण्यासाठी शाळेत आले होते. मात्र, त्याच शाळेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एम. डी. नारखेडे सरांनी शाळेला दोन लाख रुपयांची मुदत ठेव देऊन त्याच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षिसे आणि शैक्षणिक साहित्य द्यावे असा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शाळेच्या वतीने त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ,मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षकांनी प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

मात्र, भाषण देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणार्धात त्यांचे निधन झाले. ही घटना सोमवारी (दि.1) सकाळी 11:15 वाजता शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित सर्वांच्या डोळ्यांसमोर घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, पुतणी असा परिवार आहे. त्यांना अपत्य नव्हते. त्यांचे अंत्यसंस्कार आज मंगळवारी (दि.2) दहिगाव येथे करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---