Encounter In Dantewada: चकमकीत तीन नक्षलवादी ठार

Encouter In Dantewada : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्याच्या दंतेवाडा-सुकमा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झालेत. बस्तर सैनिक आणि जिल्हा राखीव गट (डीआरजी) नक्षलविरोधात कारवाई करत आहे.(Tarun Bharat live)

दंतेवाडा-सुकमा सीमेजवळील तुमकपाल आणि डब्बा कुन्ना गावांदरम्यान नक्षलवादी कारवाई केली जात होती. नक्षलवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून तपास करण्यात आला त्याचदरम्यान दोन्ही बाजुंनी गोळीबार झाला. या कारवाईची माहिती तुमकपाल येथील पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली.

 

सुरक्षा दल तपास कार्य करत असताना नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. ही चकमक सुमारे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चकमक झाली. ज्यामध्ये दरभा विभागातील तीन नक्षलवादी ठार झाले.