---Advertisement---
पाचोरा : येथील तहसिल कार्यालयसमोर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्या आंदोलनाची आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या आश्वासनंतर सांगता झाली. याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार यांनी विविध मागण्यांसाठी पाचोरा तहसिल कार्यालय समोर संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घोषणादेत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची आमदार किशोर पाटील यांनी दखल घेत सदरील प्रश्न सुरू असलेल्या पावसाळीअधिवेशनात मांडण्याचे आश्वासन आंदोलन कर्त्यांना दिल्याने आंदोलन कर्त्यांना पाचोरा तहसीलदार यांना निवेदन सादर करत आंदोलनाची सांगता करण्यात आली.
निवेदनातील मागण्यामध्ये कमिशन वाढ व्हावी,धान्य मोजून व स्वच्छ मिळावे,इ के वाय सीचा मोबदला मिळावा,कमिशनचे पैसे दरमहा 5 तारखेला खात्यात जमा व्हावे,रेंगाळलेली ऑनलाईन रेशनकार्ड ची कामे तत्काळ व्हावी, एनपीएच केशरी कार्ड धारकांना ही धान्याचा लाभ मिळावा आदींचा समावेश होता.