Entertainment : दीपिका या पुरस्कार सोहळ्याला लावणार हजेरी

Entertainment :  अभिनेत्री दीपिका  गेल्या वर्षी  ऑस्कर सोहळ्यात चमकली होती. यावेळी ती बाफ्ता या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे.

 

सेलिब्रेटी हे आंतरराष्ट्रीय  स्तरावर आपली मोहोर उमटविताना दिसत आहेत. त्यात मौनी रॉ़य, आलिया भट्ट, ऐश्वर्या रॉय, क्रिती सेनन यांच्या नावाचा समावेश आहे.प्रियंका चोप्रानं  यापूर्वीच   हॉलीवूडमध्ये तिच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे.

 

येत्या रविवारी लंडनमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सगळ्यात दीपिकासोबत जे सेलिब्रेटी आहेत त्यांना कोणत्या नॉमिनेशनसाठी पुरस्कार द्यायचे आहे हे अद्याप समोर आलेले नाही.  माहितीनुसार, ह्युग ग्रांट, एमिली इन पॅरिस फेम लिली कॉलीन, द क्राऊन फेम कोरिन आणि गिलियन एंडरसन, ब्लॅक मिरर फेम हिमेश पटेल यावेळी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.