Entertainment : सई ताम्हणकर या राजकीय पक्षात प्रवेश करणार

Entertainment :   बिनधास्त आणि बोल्ड अशी ओळख असलेली   सई ताम्हणकर लवकरच  तिच्या  आवडत्या  राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे

 

सईने  एका  मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी तिने ट्रोलिंग, लग्न, राजकारणातील आवडते नेते अशा अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

जवळपास २० वर्षे मराठी मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्रीने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 

सई ताम्हणकरला यावेळी “तुझा आवडता राजकीय पक्ष कोणता आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला.

 

यावर अभिनेत्री म्हणाली, “सई ताम्हणकर हाच माझा आवडता पक्ष आहे. कारण, माझ्या पक्षाला मीच पुढे घेऊन जाऊ शकते. पण, मला कोणते राजकीय नेते आवडतात याचं उत्तर मी जरूर देऊ शकते.”

 

तुम्ही मला राजकारणाबद्दल काहीही विचाराल, तर मी अगदी ढ आहे. राजकारणात कोणाचं काय चालू आहे याबद्दल मला अजिबात ज्ञान नसतं हे मी प्रामाणिकपणे मान्य करते.

 

माणुसकी ही एकच जात माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि यावर माझा ठाम विश्वास आहे.” असं स्पष्ट मत सईने मांडलं.