मनोरंजन : सॅम बहादुरनं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

काल 1 डिसेंबर ला  अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) हा चित्रपट आणि अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हे दोन चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्यानंतर कोणता चित्रपट जास्त कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अशातच आता दोन्ही चित्रपटांचे ओपनिंग-डे कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 

विकी कौशलच्या सॅम बहादुर या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार,’सॅम बहादूर’ चित्रपटानं  रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होईल, असा अंदाज लावला जात आहे.

सॅम बहादुर चित्रपटानं पहिल्या दिवशी 5 कोटी 50 लाख एवढे कलेक्शन  केले. हा चित्रपट विकी कौशलच्या करिअरमधील तिसरा मोठा ओपनर ठरला आहे. विकीच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 8. 20 कोटींची कमाई केली होती. तर त्याच्या ‘राझी’  या चित्रपटाने ओपनिंग-डेला 7.53 कोटींची कमाई केली होती.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटासोबत ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. ‘अॅनिमल’ चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर  ‘सॅम बहादुर’ चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 5.50 कोटी रुपये आहे.

सॅम बहादुर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार  यांनी केलं आहे. या चित्रपटात विकीनं फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे तर सॅम मानेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका सान्या मल्होत्रानं साकारली आहे. अभिनेत्री फातिमा सना शेखनं या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.