entertainment : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मधील अभिनेत्री शिवाली परबच्या रिलेशनशीपबद्दलच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. रिलेशनशीपच्या चर्चा रंगण्याचं कारणही तिनं स्वत:नं शेअर केलेले खास फोटो आहेत.
शिवालीनं एका अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिनं लव्ह हा love # हॅशटॅग वापरला आहे. तसंच हार्ट इमोजीही शेअर केलाय. त्यामुळं तिनं प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.
हा अभिनेता निमिष कुलकर्णी आहे ,जो तीचा कॉलेजचा मित्र आहे
https://www.instagram.com/p/C2J01APov51/?utm_source=ig_web_copy_link
शिवालीनं निमिषसोबतचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय की, निमिष की निषिम ? सब कलकी बातें असं म्हटलंय.
शिवालीनं शेअर केलेल्या या फोटो आणि फोटोच्या कॅप्शनमुळे आता तिच्या आणि निमिषच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. हे खरं आहे का शिवाली ? असं अनेकांनी विचारलं आहे.