सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी चालून आलीय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्य तब्बल 2674 पदांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. बारावी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही जर अद्यापही अर्ज केला असेल तर घाई करा, कारण ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे.
EPFO Bharti 2023 या पदांसाठी होणार भरती? सामाजिक सुरक्षा सहाय्यक – 2674 पदे स्टेनोग्राफर – 185 पदे
काय आहे पात्रता ? सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) – या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय त्याचा टायपिंगचा वेग इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असावा. स्टेनोग्राफर – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. याशिवाय डिक्टेशन – 10 मिनिटांत 80 शब्द प्रति मिनिट आणि ट्रान्सक्रिप्शन 50 मिनिटे (इंग्रजी) आणि 65 मिनिटे (हिंदी) असावे.
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे परीक्षा फी : 700 रुपये /- राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क नाही
इतका मिळेल पगार? सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) – 29,200 ते 92,300 लघुलेखक – 25,500 ते 81,100
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 एप्रिल 2023
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
सामाजिक सुरक्षा सहाय्यक – PDF
लघुलेखक– PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा