तरुण भारत लाईव्ह न्यूज : दर वर्षी २१/२२ मार्च तसेच २२/२३ सप्टेंबरला विषुव दिन असतो, म्हणजे सूर्य अगदी विषुव वृतांवर असतो परंतु आपल्याकडे उत्तर गोलार्धात २३ सप्टेंबर ला दिवस रात्र समान नसते. पाठ्यपुस्तके आणि सर्वसामान्य माहिती प्रमाणे २३ सप्टेंबर ला दिवस रात्र समान असतात असे मानले जाते ते वैद्न्यानिक दृष्टीने चुकीचे आहे ते बदलले पाहिजे असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यानी सांगितले आहे.
पृथ्वी सूर्याकडे २३.५ अंशाने कललेली असल्याने वर्षभर पृथ्वी च्या २३.५ अक्षांसावर उत्तर-दक्षिणेला दर रोज जागा बदलताना दिसतो.ह्याला क्रांती वृत्त म्हणतो. सूर्याच्या कर्कवृत्तावरून मकर वृत्ताकडे जाण्याच्या भासमान मार्गाला दक्षिणायन आणि मकर ते कर्कवृत्ताकडे जाण्याचा मार्गाला उत्तरायण म्हणत असतो. ह्या दोन्ही मार्गक्रमनावेळी सूर्य २१/२२ मार्च आणि २२/२३ सप्टेंबर ला दोनदा विषुववृत्त पार करीत असतो, त्या दिवसांना विषुव दिन/संपात दिन (Equinox) म्हटले जाते. २०२३ ला विषुवदिन २३ सप्टेंबर ला दुपारी १२.२० वाजता आहे. आपण ह्याच दिवशीं दिवस रात्र समान असते असे म्हणत असतो परंतु खगोलीय आणि भौगोलिक दृष्ट्या ते चुकीचे आहे. ह्या दिवशीं जगात सर्वत्र दिवस रात्र समान नसते. (१२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र) उत्तर गोलार्धात आपल्याकडे २३ सप्टेंबर नंतर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या दिवशी दिवस रात्र समान असते. पृथ्वी गोल असल्याने आणि प्रकाश वक्रीकरणामुळे हे दिवस वेगळे असतात.
कोणत्या तारखेला दिवस रात्र समान
उतर गोलार्धात ६० अक्षांसावर २५ सप्टेंबरला, ४० अक्षांसावर २६ सप्टेंबर, ३० अक्षांसा वर २७ सप्टेंबर, २० अक्षांसा वर २८ सप्टेंबर, १५ अक्षांसा वर ३० सप्टेंबरला, १० अक्षांसा वर ४ ऑक्टोबर ला दिवस-रात्र समान असते.
महाराष्ट्रात केव्हा-कुठे दिवस-रात्र समान?
खरं तर महाराष्ट्रात अक्षांसा नुसार २८-३० सप्टेंबरला दिवस रात्र समान असेल.२३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात कुठेच दिवस रात्र समान नसते.२३ तारखे ला मुंबई येथे १२.०४ ३६ तासाचा दिवस तर ११.५३.३४ तासाची रात्र असते. नागपूर येथे १२.०४.४१ तासाचा दिवस तर ११.५३.३३ तासाची रात्र असते,चंद्रपुर येथे १२.०४.३९ तासाचा दिवस तर ११.५५.३३तासाची रात्र असते.
२८ सप्टेंबर रोजी – नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, धुळे, जळगाव येथे दिवस रात्र समान
२९ सप्टेंबर रोजी – मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपुर, सातारा, सोलापूर येथे दिवस रात्र समान
३० सप्टेंबर रोजी -कोल्हापूर, रत्नागिरी येथे दिवस रात्र समान असेल.