तरुण भारत लाईव्ह । २९ ऑगस्ट २०२३। ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच एक वैशिट्य आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रहाची स्थिती हि महत्वाची असते. एका ठराविक वेळेला ग्रह जागा बदलत असतात. याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. शनी हा त्याच्या कुंभ राशीत आहे. तर सूर्य हा सिंह मध्ये असल्याने समसप्तक योग तयार झाला आहे. तर हा समसप्तक योग कोणत्या राशींसाठी शुभ आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
हा काळ मेष राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नवीन घर बनण्याचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील. संततीकडून शुभ वार्ता समजतील. एकूणच हा काळ तुमच्यासाठी आनंदीआनंद घेऊन येईल.
मिथुन रास
या काळात मिथुन राशींच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. ऑफिस मध्ये नवीन प्रकल्पासाठी तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल. आणि तुम्ही हि जबाबदारी योग्य रित्या पार पाडाल. एखादी नवीन कला शिकण्याची संधी मिळेल. सर्व काही तुमच्या मनासारखे होईल.
तूळ रास
या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. कामे वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. करियर मध्ये नवीन संधी मिळेल.