Erandol : एरंडोल शहर पहाटेपासूनच झाले राममय

Erandol : येथे पांडव वाडा बहुउद्देशीय संस्था , सर्व गणेश मंडळे, जय श्रीराम प्रतिष्ठान, भगवा चौक परिसर , पुरा भाग, सर्व नवीन वसाहती, बचपन इंग्लिश मीडियम स्कूल आदी संघटना तर्फे श्रीराम मिरवणुका मोठ्या जल्लोषात,जयघोषात , फटाक्यांच्या अतिषबाजी करत सहवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या.

शहरात चौका चौकात व मोक्याच्या ठिकाणी विद्युत रोषणाई व पताका लावून सजावट करण्यात आली तसेच सर्वत्र रांगोळ्या काढून सर्वत्र रस्ते सुशोभित करण्यात आले. पांडव वाडा बहुउद्देशीय संस्थेतर्फे पांडव वाड्यापासून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन शहरातील विविध मार्गाने मिरवणूक नेण्यात आली. ठिकठिकाणी मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला व प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेला औक्षण करण्यात आले.

२२ जानेवारी श्रीराम प्रतिष्ठान दिवसाचे औचित्य साधून शहरात विविध ठिकाणी भजन संध्या, हरिनाम कीर्तन सप्ताह, फराळ वाटप, भोजन भंडारा, लाडू वाटप मोठ्या संख्येने करण्यात आले. जवळपास सर्वच घरांवर भगवे ध्वज देखील लावण्यात आले. या निमित्ताने जणू काही शहर पूर्ण राम मय झाले होते ‌. विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठण, राम रक्षा पठाण असे उपक्रम दिवसभर राबविण्यात आले.

‌ श्रीराम आराध्य दैवत असल्यामुळे शहरातील सर्वच नागरिकांनी उस्फूर्तपणे सर्वच कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला चिमुरड्यांच्या उत्साहाला उधाण आले.