Erandol : येथे बस स्थानकामध्ये शिरत असताना एका वृद्ध प्रवाशाला बाहेरगावी जाण्यासाठी निघालेल्या बस ने धडक दिली. त्यात मानसिंग लुमान सिंगपाटील [वय ७३ वर्ष राहणार खडके खुर्द] हा वृद्ध प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली. उपचारा दरम्यान संध्याकाळी त्याचे निधन झाले.
मानसिंग पाटील हे एका रुग्ण नातेवाईकाला दवाखान्यात पाहण्यासाठी एरंडोल येथे आले होते ते काम आटवून घरी खडके खुर्द येथे जाण्यासाठी बस स्टॅन्ड मध्ये शिरत होते त्यावेळी स्थानकातून बाहेर निघालेल्या एम एच २०/ ३९८३ क्रमांकाच्या बस ने त्यांना धडक दिली.
मृत व्यक्तीच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.