---Advertisement---

Erandol News: एरंडोलमध्ये विवाहितेची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात

---Advertisement---

Erandol News: जिल्ह्यतील एरंडोल येथे एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरच्या वरच्या मजल्यावर रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्याचे काम सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मनीषा सागर सोनार (३५) असे मयत विवाहेतीचे नाव आहे. मयत मनीषा ही पती सागर सोबत पुणे येथे वास्तव्यास होती. गेल्या वर्षभरापासून मनीषा ही पती व नऊ वर्षीय मुलासह एरंडोल येथे राहत होती. दरम्यान काल ४ जून रोजी रात्री मनीषा ही परिवारासोबत जेवण करून वरच्या मजल्यावर गेली, बराच वेळ झाला तरी मनीषा ही खाली न आल्याने मनीषाचा मुलगा आईला बघायला वर गेला असता, मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. दरम्यान घरातील इतर सदस्यांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी रवाना केला.

मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच माहेरच्या मंडळींनी एरंडोल गाठत एकच हंबरडा फोडला. दरम्यान मयत मनीषाचे सासू सासरे वर्धा येथे असल्याचे समजते. मनीषा सोनार हिने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---