ESIC Recruitment 2024 । सुवर्णसंधी ! परीक्षा न देता मिळवा सरकारी नोकरी, मिळेल इतका पगार

ESIC Recruitment 2024 । नोकरीच्या शोधात असलेल्या युवक व युवतींसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. विशेषतः परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. जो उमेदवार पात्र ठरेल त्याला वेतन स्तर-11 अंतर्गत दरमहा 67,700 रुपये पगार, याशिवाय भारत सरकारच्या नियमांनुसार इतर भत्तेही लागू होणार आहेत.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मधील वरिष्ठ निवासी पदे भरली जाणार आहेत. ESIC च्या या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्याकडेही या पदांशी संबंधित पात्रता असल्यास, तुम्ही ESIC च्या अधिकृत वेबसाइट esic.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. या भरतीतून एकूण 13 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना कोणत्याही लेखी परीक्षेला बसावे लागणार नाही.

ESIC मध्ये नोकरी मिळवण्यासाठी वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय मुलाखतीच्या तारखेनुसार ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे वयाची सूट दिली जाईल, जी भारत सरकारच्या नियमांनुसार लागू होईल.

ESIC मध्ये किती मिळेल पगार 
ESIC च्या या भरतीसाठी जो उमेदवार निवडला जाईल, त्याला वेतन स्तर-11 अंतर्गत दरमहा 67,700 रुपये दिले जातील. याशिवाय भारत सरकारच्या नियमांनुसार इतर भत्तेही लागू होतील.

अशी आहे निवड प्रक्रिया
वॉक-इन मुलाखतीद्वारे ESIC भरती 2024 साठी उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी कोणताही प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना त्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागेल.

महत्वाची माहिती
ESIC च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणीही खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे लागेल.
मुलाखतीची तारीख: 15 ऑक्टोबर 2024
स्थान: शैक्षणिक ब्लॉक, ESIC मेडिकल कॉलेज आणि PGIMSR, राजाजीनगर, बंगलोर – 560 010
नोंदणीची वेळ: सकाळी 09:30 ते सकाळी 10:30