---Advertisement---

आपण एकत्र असलो तरी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा

---Advertisement---
  1. मालेगाव : उद्धव ठाकरे गटाची आज मालेगावमध्ये सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल स्पष्टपणे सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला.. तुम्ही आईच्या कशीवर वार केला, असाही टोला शिंदे आणि ४०  बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी लगावला.  तसेच भाजपसह निवडणूक आयोगावर टीका केली. 

राहुल गांधींना इशारा
यावेळी बोलताना उद्दव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकरांच्या मुद्द्यावरु खडसावले..आपण एकत्र असलो तरी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी राहुल गांधींना दिला.

मुख्यमंत्री शिंदेंना टोला 
शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही का? भाषण बरे वाचता येते.. मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात.. केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी विरोधात धोरण आहे, त्याविरोधात तुम्ही आवाज उठवा.. पण बकरे कधी आवाज उठवणार?
तोंड उघडले तर काय बाहेर पडणार.. यांच्याकडून आपेक्षा काय करणार.. मुख्यमंत्री शेतकरी आहेत.. मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन दोन हॅलिपॅड आहेत.. असा टोला लगावला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment