वेध
– अनिरुद्ध पांडे
50 वर्षांपूर्वी 1973 साली सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट म्हणून (Bobby Movie) ‘बॉबी’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची नोंद झाली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शोमॅन’ अशी प्रतिमा असलेल्या राज कपूर यांनी आपल्या ‘यातनाम ‘आरके’ स्टुडिओच्या नावाने प्रदर्शित केलेला हा चित्रपट त्यातील फ्रेशनेस, टवटवीतपणामु——ळे त्यावेळी तुफान यशस्वी झाला होता. हा बहारदार चित्रपट आजही नव्या पिढीलाही तितकाच फ्रेश वाटतो. त्या काळात थोडाफार धाडसी म्हणता येईल, असा हा चित्रपट ‘त्या’ कारणासह इतरही सर्व आघाड्यांवर प्रेक्षकांना आवडला होता. अगदीच नवतरुण जोडीची प्रेमकथा असूनही ती युवा पिढीसोबतच त्यावेळच्या मध्यमवयीनांनाही त्याच्या चकचकीत सादरीकरणामुळे आवडली होती. ‘बॉबी’पूर्वी राज कपूर यांचे चित्रपट सामान्यपणे प्रेमाच्या एका कोपर्यासह सामाजिक विषयांकडे लक्ष वेधणारे असायचे. कदाचित ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशानंतर राज कपूर यांनी त्यातील नुकसान भरून काढण्यासाठी (Bobby Movie) ‘बॉबी’चे प्रेमकथानक निवडले असावे. राज कपूरची ‘याती आणि जुनी निर्मिती बघता समीक्षक आणि बुद्धिजीवींनी ‘बॉबी’वर टीका केली. त्यावेळी राज कपूर यांनी, माझा बॉबी हा चित्रपट ‘फ्लॉप’ झाला असता तर या लोकांनी त्याला ‘क्लासिक’ म्हटले असते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नोंदवली होती. असे सांगतात, ‘मेरा नाम जोकर’ने राज कपूरला 80 लाखांचा दणका दिला होता आणि 25 लाखांत बनविलेल्या ‘बॉबी’ने साडेपाच कोटी रुपये मिळवून दिले होते. तो त्या वर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट.
50 वर्षांपूर्वीचा सुपरस्टार राजेश खन्ना याला घेऊन राज कपूरला हा (Bobby Movie) ‘बॉबी’ बनवायचा होता, पण त्याचा भाव खूपच जास्त असल्यामुळे ते राज कपूरने टाळले. राजेश खन्ना या महागड्या हिरोऐवजी अगदी फुकटातलाच, आपला मुलगा ऋषी कपूर यालाच सादर केले. ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया या दोघांचाही हा नायक-नायिका म्हणून पहिलाच चित्रपट; त्यामुळेच ‘लो-बजेट…!’ याच बॉबीसाठी महाग ठरलेल्या राजेश खन्नाचे याच ‘बॉबी’ डिम्पल कपाडियासोबत पुढे लग्न झाले, हा एक गमतीदार घटनाक‘म. चित्रपट निर्मात्याला आपले आर्थिक गणित सांभाळून निर्मिती करावी लागते, तेच राज कपूरने त्यावेळी केले. त्यात तो यशस्वीही ठरला. ‘बॉबी’ने भारतातील कित्येक ग्रामीण भागांमध्ये शहरात जाण्यासाठी खास बसेस सोडायला लावल्या होत्या 50 वर्षांपूर्वी. तरुणाईने भरभरून या बसेस टॉकीज असलेल्या गावांना जायच्या आणि सिनेमा संपल्यावर त्यांना पुन्हा गावी सोडून द्यायच्या. ‘बॉबी’ (Bobby Movie) डिम्पल आणि ऋषी या मुख्य जोडीसह प्राण, प्रेमनाथ, अरुणा इराणी, दुर्गा खोटे, सोनिया सहानी, फरिदा जलाल, पिंचू कपूर, प्रेम चोपडा अशी कलाकारांची तगडी चमू या चित्रपटात होती. सोबतच निर्माता व दिग्दर्शक राज कपूर, छायाचित्रकार राघू करमाकर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, आनंद बक्षी, विठ्ठलभाई पटेल व इंद्रजितसिंह तुलसी हे गीतकार, ‘वाजा अहमद अब्बास यांची कथा आणि पत्रकार जैनेंद्र जैन यांचे संवाद अशी दणकेबाज सोबत होती.
लता मंगेशकर, शैलेंद्रसिंह आणि नरेंद्र चंचल या गायकांची बहुतांश गीते त्या काळी रसिकांच्या ओठांवर बसली होती. ‘मै शायर तो नही’, ‘झूठ बोले कौवा काटे’, ‘हम तुम एक कमरे मे बंद हो’, ‘ना मांगू सोना चांदी’, ‘अक्सर कोई लडकी इस हाल में’ ही सारी लता मंगेशकर आणि शैलेंद्रसिंह यांची गीते लोकप्रिय झाली होती. शैलेंद्रसिंह हा ऋषी कपूरला पुढे अनेक वर्षे ‘सूट’ झालेला गायकस्वर ठरला. पण गाण्यांच्या या गराड्यातही वेगळेपणा घेऊन आलेले ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे नरेंद्र चंचल यांनी गायलेले गीतच अव्वल ठरले होते. त्यावर्षी याच गाण्यासाठी चंचल यांनी उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता तर उत्कृष्ट कलावंत स्त्री आणि पुरुष पुरस्कार (Bobby Movie) बॉबीचेच ऋषी आणि डिम्पल यांनी खिशात घातले होते. चौथा पुरस्कार ए. रंगराज यांनी कला निर्देशनासाठी मिळविला होता. ऋषी कपूरला मिळालेला उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार त्याच वर्षी ‘कोशिश’साठी संजीवकुमारला अपेक्षित होता. त्याची उलटसुलट चर्चाही झाली. पण संजीवकुमारने त्याच भूमिकेसाठी त्याच वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावून ऋषी कपूरला झाकोळून टाकले होते, हेही खरेच. यातील सर्व गाणी म्हणणार्या लता मंगेशकर यांच्या 28 सप्टेंबर 1973 या वाढदिवशी राज कपूरने ‘बॉबी’ प्रदर्शित करून त्यांच्याप्रती खास आत्मीयताच व्यक्त केली होती. बॉबीच्या नेमक्या 50 व्या वर्षी लताजींना या देशाने गमावले, हाही एक हळवा कंगोरा या निमित्ताने उजागर झाला. प्रेमकथांवर आधारित अनेक चित्रपट ‘बॉबी’पूर्वी आणि नंतर आले, काही यशस्वीही झाले. पण या गराड्यात आपले वेगळेपण, टवटवीतपणा, ताजेपणा दाखवून देतो आणि टिकवून ठेवतो, तो सदाबहार (Bobby Movie) ‘बॉबी’च..!
– 98817 17829