मँगो मोजिटो कधी ट्राय केलं आहे का?

तरुण भारत लाईव्ह । २४ मे २०२३। आमरस, मँगो लस्सी, यांसारखे आंब्याचे पारंपरिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. आंब्यापासून बनवलेला मँगो मोजिटो कधी ट्राय केलंय का? मँगो मोजिटो  घरी बनवायला खूप सोप्प आहे. मँगो मोजिटो घरी कस बनवावं हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
आंब्याचे तुकडे, क्लब सोडा, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि साखरेचा पाक, बर्फ, मीठ.

कृती 
सर्वप्रथम, ब्लेंडरमध्ये, आंब्याचे ताजे तुकडे टाकून एक गुळगुळीत प्युरी तयार होईपर्यंत मिसळा. एका ग्लास मध्ये ६ पुदिन्याची पाने, अर्धा लिंबाचा तुकडा, लिंबाचा रस आणि साखरेचा पाक एकत्र करा. नंतर दुसरा ग्लास घेऊन त्यामध्ये उरलेले आंब्याचे तुकडे, पुदिना, लिंबाचा रस आणि साखरेच्या पाकात मिक्स करा. प्रत्येक ग्लासमध्ये अर्धी आंब्याची प्युरी टाका. आता बर्फाचे क्यूब आणि सोडा घालून मिक्स करा. टॉपला बर्फ घाला आणि मिक्स करा. सर्व्ह करण्यासाठी मँगो मोजिटो तयार आहे.