पनीर पराठे कधी ट्राय केले आहेत का?

तरुण भारत लाईव्ह । १९ मार्च २०२३। पराठे हे जवळपास सगळ्यांनीच खाल्ले असतील. मेथीचे पराठे, बटाट्याचे पराठे, या प्रकारचे पराठे तुम्ही खाल्ले असतील. पण पनीर पराठे तुम्ही कधी ट्राय केले आहे का? पनीर पराठा ही प्रोटीन रिच रेसिपी आहे जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पनीर पराठे तुम्ही घरी करून सुद्धा खाऊ शकतात. पनीर पराठे घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
गव्हाचे पीठ – २ कप, किसलेले पनीर – १ कप, किसलेले उकडलेले बटाटे – ३/४ कप, आले किसलेले – १ टीस्पू, हिरवी मिरची – २-३, जिरे पावडर – १/२ टीस्पून, धने पावडर – १/२ टीस्पून, लाल तिखट – १/२ टीस्पून, गरम मसाला – १/४ टीस्पून, कोथिंबीर चिरलेली – २ चमचे, पुदिन्याची पाने चिरलेली – १ चमचा,  आमचूर – १/२ टीस्पून, बटर/तेल – २-३ चमचे, मीठ – चवीनुसार

कृती
पनीर पराठा बनवण्यासाठी प्रथम गव्हाचे पीठ मिक्सिंग बाऊलमध्ये चाळून घ्या, त्यात थोडे तेल, मीठ घाला आणि थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. यानंतर पीठाला थोडे तेल लावून २०-२५ मिनिटे कापडाने झाकून ठेवा.  आता एक मध्यम आकाराचे मिक्सिंग बाऊल घ्या, त्यात किसलेले पनीर आणि किसलेला बटाटा घालून दोन्ही चांगले मॅश करा.  आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, आले, हिरवी धणे, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला, लाल तिखट घालून सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्या. यानंतर मसाल्यामध्ये पुदिन्याची पाने आणि कैरीची पूड घालून चवीनुसार मीठ मिक्स करून पराठ्यासाठी मसाला तयार करा. यानंतर पुन्हा एकदा पीठ मळून घ्या आणि त्यातून गोळे बनवा. आता कढई मध्यम आचेवर गरम करा आणि पिठाचे गोळे पुरीच्या आकारात लाटून त्यात पनीरचे तयार सारण भरा आणि कडा मध्यभागी आणून स्टफिंग बंद करा.  त्यानंतर त्याला वर्तुळाचा आकार द्या. आता हा गोळा हलका दाबून पराठा गोलाकार आकारात लाटून घ्या. यानंतर तव्यावर थोडं तेल टाकून ते भोवती पसरवून पराठा टाकून मध्यम आचेवर भाजून घ्या. थोड्या वेळाने पराठा पलटून त्यावर तेल लावा. पराठा दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजा. आणि सर्व्ह करा पनीर पराठे.