प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वच्छतेला अंगिकारावे : भरतदादा अमळकरांचे प्रतिपादन

---Advertisement---

 

जळगाव : जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व आहे, ते आपल्या अंगी रुजवावे असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी केले. ते पुढे म्हणाले कि, आज जो उपक्रम राबविण्यात आलेला आहे, ते केवळ स्वच्छता अभियान नसून हा एक श्रम संस्कार आहे जो विद्यार्थ्यांनी आयुष्यभर अंगीकारावा असे आवाहन केला.

स्वच्छता मोहीम विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी राबविण्यात येते. गणेश विसर्जनानंतर रविवार (७ सप्टेंबर) रोजी सकाळी “स्वच्छ भारत – सुंदर भारत” या संकल्पनेतून शिवतीर्थ मैदान ते सुभाष चौक या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शिवतीर्थ मैदानांवर आयोजित समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतदादा अमळकर हे बोलत होते.

या मोहिमेत विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव संस्थेच्या शाळा व महाविद्यालय यामधील सुमारे १५०० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले आहेत. मार्गावरील कचरा त्याची योग्य विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे, पर्यावरण संरक्षणाचा विचार करून व्यवस्थापन करण्यात आले.

या स्वच्छता उपक्रमात काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल (C.B.S.E.), ब. गो. शानभाग विद्यालय, इंग्लिश मिडियम स्कूल, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा (वाघनगर), विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ महाविद्यालय, श्रवण विकास, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय या शैक्षणिक विभागांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत विवेकानंद प्रतिष्ठान व केशवस्मृती परिवाराचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---