---Advertisement---

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे : सतीश मदाने

---Advertisement---

---Advertisement---


जळगाव : पर्यावरणामुळे आपले जीवन अधिक सुंदर आणि सुरक्षित होते. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात किमान एक झाड लावून त्याची काळजी घेतली पाहिजे. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव सह जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी केले. ते सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव परिसरात वृक्षरोपणप्रसंगी बोलत होते.

पिंप्राळा येथील सोनी नगर परिसरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर परिसरात गुरुवारी (31 जुलै ) सकाळी विविध प्रकारची 25 वृक्ष ट्री गार्ड सहित सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, श्रीकृष्ण मेंगडे, घनश्याम बागुल, नारायण येवले, विठ्ठल जाधव, मधुकर ठाकरे, भैय्यासाहेब बोरसे, निलेश जोशी, विनोद निकम, सोपान पाटील, विजय भावसार, मिलिंद पाटील, धनंजय सोनार, चंद्रकांत जोशी , गजानन पाटील, संजय बोरनारे, नरेश बागडे, मधुकर पाटील, नितीन झंवर, महेंद्र पाटील, नितीन चौधरी, संदीप कासार, शशिकांत बोरसे, महेश सावदेकर,नचिकेत पेठकर, गजानन खोरखेडे आदी मान्यवर यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.

मदने पुढे म्हणाले की, वृक्षारोपण करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि अनेक फायदे मिळतात. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, हवा शुद्ध करतात, मातीची धूप थांबवतात, आणि विविध प्राण्यांना आणि पक्षांना आसरा देतात असेही ते म्हणाले. आरती हुजुरबाजार यांनी आपण सर्वानी झाडांना नियमितपणे पाणी देऊन त्यांचे गुरे-ढोरे व इतर नुकसानीपासून बचाव केला पाहिजे. झाड रोपटे असताना त्याला नियमित पाणी देऊन त्याची योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन उपस्थितांना केले.

जळगाव जनता सह बँकेतर्फे 25 वृक्ष ट्री गार्ड सहित जागृत स्वयंभू महादेव परिसरासाठी उपलब्ध करून दिल्याने नरेश बागडे, मधुकर ठाकरे, नारायण येवले, विनोद निकम, विठ्ठल जाधव, भैय्यासाहेब बोरसे, सोपान पाटील, संदीप कासार यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---