काळजी घ्या! तज्ज्ञांनी दिली नव्या व्हेरिएंटबद्दल धक्कादायक माहिती, ७९६ देशांमध्ये आढळले नवीन रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना काळ कुणीही विसरणं कठीण आहे मात्र आता पुन्हा नव्या व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांनी धक्कादायक माहिती दिली आहे. भारतात कोरोनाची लाट देशात पुन्हा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत जगभरातील ७९६ देशांमध्ये नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

तज्ञ काय म्हणताय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक संक्रमण करणारा आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पॉँडेचेरीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या राज्यात कोरोनामुळे एक-एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नव्याने कोरोना रुग्ण वाढू लागल्याने नागिराकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिक सतर्क असणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य मंत्रालय काय म्हणतंय?
आरोग्य मंत्रालयांचं म्हणणं आहे की, ‘देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ हजारांहून अधिक झाली आहे. देशात XBB 1.16 और XBB 1.15 व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पॉँडेचेरीमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नव्याने आढळून येणारा XBB.1.16 कोरोना व्हेरिएंट हा XBB चा कोरोना  (Corona) व्हेरिएंट आहे.

गळ्यात खवखव होणे , सर्दी होणे, ताप येणे अशी या कोरोना व्हेरिएंटची लक्षणे आहेत. तर काही लोकांना थकवा येणे, डोकेदुखी, सर्दी होणे, अंग दुखणे ही नव्या कोरोना व्हेरिएंटची लक्षणे आहेत.

अमेरिकेपेक्षा भारतात अधिक रुग्ण

भारतात XBB.1.16 हा कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहे. जगाच्या तुलनेत भारतात या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण अधिक आहेत. अमेरिकेत या व्हेरिएंटचे १५ रुग्ण आणि सिंगापूरमध्ये १४ रुग्ण आढळून आले आहेत. तर भारतात या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण हे ४८ आहेत.