पुणे : सात मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे 7 मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रानुसार, पुण्यातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करणाऱ्या मनसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी कार्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांनी पक्षात राहून कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रकार केला, त्यामुळे 7 मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आला आहे.
यांची हाकलपट्टी
या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असं शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी जाहीर केलं आहे. पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र या निवडणुकीच्या प्रचार करणार नाही, असंही त्यांनी पाठिंबा देताना जाहीर केलं होतं. या संदर्भात मनसेची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, हेमंत संभूस, अजय शिंदे, गणेश सातपुते, योगेश खैरे, रणजित शिरोळे, बाळा शेडगे, साईनाथ बाबर आदी उपस्थित होते. बैठकीत भाजपला मदत करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना थेट प्रचार करता येणार नाही. मात्र तुम्ही वैयक्तित पातळीवर प्रचार करता येईल, असं या बैठकीत सांगण्यात आलं आहे.