एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरव पाटील यांची हकालपट्टी

मुंबई : एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी जोरदार दणका दिलाय. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आलेय. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक आहेत. आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट कारवाई करण्यात आली आहे.