MHT CET Exam २०२३ : राज्यभरातील एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व बी. एस्सी. (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षास प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय परीक्षा आयोजन मंडळाने घेतला आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत, ही परीक्षा 2023-24 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी/तंत्रज्ञान फार्मसी आणि कृषी शिक्षणातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जात आहे. ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.
याशिवाय राज्याबाहेरही परीक्षा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान या परीक्षेसाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. मात्र ही मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवार स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल “महाराष्ट्र” महाराष्ट्रच्या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकणार आहे. त्यानुसार येत्या गुरुवार म्हणजेच 20 एप्रिल पर्यंत ऑनलाइन अर्ज (Online Application) दाखल करता येणार आहे.
CET अर्ज फॉर्म 2023 ऑफलाईन मोडमध्ये भरण्यासाठी उमेदवारांसाठी कोणताही पर्याय नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शिवाय मात्र उमेदवारांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना 500 रुपये अतिरिक्त विलंब शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाची पुष्टी 8 एप्रिल ते 20 एप्रिल 2023 पर्यंत करता येईल. तर निर्धारित शुल्क अदा करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत आहे. मेमध्ये परीक्षा होणार असून, पीसीएम आणि पीसीबी अशा दोन ग्रुपमध्ये स्वतंत्ररित्या ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर MHT CET परीक्षा विदेशी नागरिकांसाठी देखील खुली असून भारतीय परदेशी नागरिक, एनआरआय असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.