---Advertisement---
Extramarital Affair : पती, मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, अश्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका वकिलाची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. हा धक्का सहन न झाल्याने पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
पोलीस सूत्रानुसार, पत्नी पळून गेल्यानंतर वकील नैराश्यात गेला. त्याने घरी विष प्राशन केले. त्याच्या कुटुंबियांना तो बेशुद्ध अवस्थेत आढळला, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांना त्याच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली. त्यावर लिहिले होते, “मी आता जगू शकत नाही. ज्याने मला आणि माझ्या मुलांचा विश्वासघात केला, त्याला माझ्या मुलांजवळ येऊ देऊ नका.” पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण कौटुंबिक तणावाशी संबंधित आहे. वकिलाची पत्नी आणि तिचा प्रियकर सध्या गायब आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की पती सध्या रुग्णालयात दाखल आहे आणि तो जबाब देण्याच्या स्थितीत नाही. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याचे जबाब नोंदवले जाईल.
अचानक घरातून गायब….
उत्तर प्रदेशातील बरेली येथे ही घटना घडली. पोलीस सूत्रानुसार, बरेली येथील एका वकिलाचे लग्न होऊन सुमारे आठ वर्षे झाली होती. त्यांना दोन लहान मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. कुटुंबाने तिला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिला.
काही दिवसांपूर्वी ती अचानक घरातून गायब झाली. कुटुंबाला वाटले की ती तिच्या पालकांच्या घरी गेली आहे, परंतु जेव्हा ती तिथे सापडली नाही तेव्हा पतीने तिचा शोध सुरू केला. नंतर, त्यांना कळले की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.






