Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!

Extramarital Affairs News : पती-पत्नीचं नातं हे विश्वासाचं आणि समर्पणाचं असतं, मात्र काहीवेळा अशा घटना घडतात की या नात्यावरचा विश्वासच उडतो. असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच उघड झालं आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आबिद जत्रेमध्ये पाळणा लावण्याचं काम करायचा. काही महिन्यांपूर्वी पाळणा फिट करताना अचानक तो पडला आणि त्याचं मणक्याचं हाड मोडलं. त्यामुळे त्याच्या शारीरिक स्थितीत बदल झाले, आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले. या काळात त्याची पत्नी शबाना कुटुंबाचा आर्थिक भार उचलत होती.

हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!

दरम्यान, शबानाची ओळख इन्स्टाग्रामवर रेहान नावाच्या एका ऑटो ड्रायवरसोबत झाली. दोघं एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संबंधात प्रेम निर्माण झाले. शबानाला आता रेहानसोबत आयुष्य घालवायचं होतं, पण आबिद त्याच्या आणि शबानाच्या नात्यात अडथळा ठरत होता. त्यामुळे शबानाने रेहानला सांगितलं की, जर त्यांना एकत्र यायचं असेल, तर आबिदला संपवावं लागेल.

रेहानने शबानाला सांगितलं की, ते दोघं हे काम एकटे करू शकत नाहीत. त्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेणं आवश्यक आहे. शबानाने त्याला सांगितलं की, तू आपल्या विश्वासू मित्राशी संपर्क साधो. त्यानंतर रेहानने विकास नावाच्या व्यक्तीला विचारलं आणि विकासने पैशांची मागणी केली. शबानाने दोघांना प्रत्येकी 20 हजार रुपये दिले.

रात्री शबानाने आपल्या पतीला दारू पाजली. आबिद झोपल्यानंतर, शबानाने रेहान आणि विकासला घरी बोलावलं. शबानाने आधी आबिदच्या छातीवर बसून त्याचे दोन्ही हात पकडले, तर विकासने त्याचा गळा आवळून हत्या केली.

हत्या आणि नंतरचं नाटक

त्यानंतर, शबानाने रेहान आणि विकासला पाठवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आबिदच्या मृत्यूवर रडण्याचं नाटक केलं. तिने सांगितलं की, आबिद जास्त दारु पिल्यामुळे मरण पावला. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर हत्येची शंका उबवली आणि शबानाची कसून चौकशी केली गेली. शबानाने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी असलेल्या रेहान आणि विकाससह तिला अटक केली आहे.

दरम्यान, हा प्रकरण पती-पत्नीच्या नात्यांमध्ये विश्वास आणि प्रेमाच्या अभावामुळे उभा राहिलेल्या एका अमानुष कृत्याचा आहे. या धक्कादायक हत्याकांडामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.