---Advertisement---

फडणवीस उध्दव ठाकरेंना म्हणाले, फडतूस कोण महाराष्ट्राला माहिती

---Advertisement---

नागपूर : रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून टीका केली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरे म्हणजे माझा सवाल असा आहे की, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात, त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल त्यांनी केला. ज्यांच्या काळात पोलिस एक्सॉर्टशन करतात. आमचे तोंड उघडले तर त्यांची पळता भुई थोडी होईल. त्यामुळे संयमाने बोला. हा जो थयथयाट आहे, ते फर्स्टेशन असून, त्याला उत्तर देण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मोदींचे फोटो लावून निवडून येता. विरोधकांची लाळ घोटता. तेव्हा खरा फडतूस कोण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. याचे उत्तर त्यांना जनता देईल. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे. जो चुकीचे काम करेल त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. एखादी घटना घडली की त्याची निष्पक्ष चौकशी करू. राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment