तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । मराठीत एक म्हण आहे ती अशी की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना शिवसेना उबाठा गट राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती काहीशी अशीच आहे. अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत याची अनुभूती येत असते. राज्य पातळीवर उभाठा चे संजय राऊत काही बोलले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले काही कडक उत्तर देतात तीच परिस्थिती राष्ट्रवादीची ही आहे राऊत काही बोलले की विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा समाचार घेतात अगदी कोण राऊत? मी ओळखत नाही इथपर्यंत वेळ येते. सायंकाळी या पक्षांची बैठक होते आणि सांगितले जाते की जागा वाटपाचे सूत्र ठरले आणि सायंकाळी एक पक्ष जास्त जागांवर दावा करतो त्याला दुसऱ्या पक्षातील नेता दम भरतो.
या गमतीजमतींचे पडसाद गल्ली पातळीपर्यंत उमटत असतात. जळगाव जिल्ह्यातही याची प्रचिती गेल्या सहा सात महिन्यांपासून येत आहे जिल्ह्यात काही सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. यात प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा उत्पादक सहकारी संघ आणि नुकत्याच झालेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक या प्रत्येक ठिकाणी आघाडीत बिघाडीचा प्रत्यय आला किंवा काही ना काही वाद झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीतील संजय पवार यांना काही नेते मंडळी कडून निवडणूक लढवण्यास विरोध झाला मात्र त्या आदेशांना नजुमानता ही निवडणूक लढवली व विजय मिळवला. त्यानंतर बँकेचे चेअरमन पदाच्या निवडणुकीत पक्षाकडून विरोध असताना त्यांनी अर्ज दाखल केला आणि भाजप शिवसेनेच्या मदतीने अध्यक्ष पद मिळवले. संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारखे दिग्गज त्यांना विरोध करत होते मात्र तो जुगारून त्यांनी बाजी मारली दूध उत्पादक संघातही त्यांना पक्षाकडून विरोध झाला तो देखील त्यांनी जुमानला नाही राष्ट्रवादी भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांना एका बॅनरवर आणून पवार यांनी अनोख्या युतीची चाहूल दिली आणि वाद सुरू झाला.
अखेर वैतागलेल्या पक्ष नेतृत्वाने त्यांना पक्षातून बडतर्फ केले आणि कायदेशीर कारवाईचा सज्जत दम भरला तरीही हा पट्टा मानायला तयार नाही मी राष्ट्रवादीचाच असा आहे का त्यांनी सुरू ठेवला हे युद्ध येथे थांबले नाही तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शिवसेना उभा ठाक झाला राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी निष्कर्षमण पाटील यांचे नाव सभापतीसाठी पदासाठी निश्चित केले होते मात्र ऐनवेळी शामकांत सोनवणे यांनी बाजी मारली ही निवड लोकशाही नाही तर हुकूमशाही पद्धतीने झाली आपल्याला दमदाटी आणि धक्काबुक्की झाली असा आरोप लक्ष्मण पाटील यांनी माध्यमांसमोर करत उभा ठाकला. गटाला घरचा आहेर दिला आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते पण एका मताने घोटाळा झाला ते मत काँग्रेस कडील होते असा संशय नंतर व्यक्त केला जात होता.. आघाडीतील ही बिघाडी अशा पद्धतीने सुरू आहे आगामी काळा हा तर निवडणुकीत निवडणुकांची मालिका घेऊन येणार आहे आघाडीतील बिघाडीची ही विनंती असल्याने भविष्यात कसे पडतात असतील हे दिसेलच. जळगाव ग्रामीण मतदार संघातून उभाठाचे गुलाबराव बाग बाशिंग बांधून आहेत तर राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकरही तयारीला लागले आहेत बघा आता काय चित्र असेल या मतदारसंघात मागे एकदा उत्साह देवकरांनी ग्रामीण मतदारसंघातील सुषमा अंधारे यांच्या सभेत घुसकोरी केली याबाबत उभाटा गटाकडून नाराजी व्यक्त केली जात होती मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है असा काहीसा हा प्रकार झाला होता या तीन-चार घटनांमुळे आगामी काळातील बिघाडीचे संकेतच मिळत आहेत.