जळगाव : जळगाव शहरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल अडीच लाख रुपयांची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ‘लॅक्मे’ या ब्रॅण्डच्या नावाखाली सौंदर्य प्रसाधनांचे बनावट तथा हलक्या दर्ज्याचा माल विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विपीन प्रताप वरयाणी (33, सिंधी कॉलनी, कंवरनगर) याच्याविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
फिल्ड ऑफिसर सिध्देश सुभाष शिर्के (31, नेत्रिका, कन्सलटींग अॅण्ड इन्वेस्टीगेशन, मुंबई, रा. 4/4 के. एच.दुबे इस्टेट, शामनगर, जोगेश्वरी-पूर्व, मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. जळगाव शहरातील जळगाव शहरातील बळीराम पेठ, एम.जी.रोडवरील साई प्लाझा या संकुलातील पहिल्या मजल्यावरील गाळा नं. 15,16 व 17 मधील शान एनएक्स या दुकानात व सेंट्रल फुले मार्केटच्या तळमजल्यावरील गाळा नं. 50 मधील शान जनरल या कॉस्मेटीक दुकानात बनावट ) ‘लॅक्मे’ या ब्रॅण्डच्या नावाखाली सौंदर्य प्रसाधनांची विक्री सुरू होती. या दुकानांमध्ये एकूण दोन लाख 58 हजार 31 रुपये किंमतीचा हिंदुस्तान युनिलिव्हरचे ‘लॅक्मे’चे वेगवेगळे व रॅटकिट कंपनीनीचे वीट हेअर रिमुव्हर क्रिम प्रॉडक्ट सारखा हुबेहुब बनावट माल कंपनीच्या नावाचे बनावट लेबल व पॅकींगमध्ये बनावट व हलक्या दर्जाचा माल अस्सल असल्याचे भासवून विक्री करण्यात येत होता. या प्रकरणी कॉपीराईट कायद्यांतर्गत विपीन वरयाणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.