---Advertisement---
तळोदा : शिर्वे शिवारातून कृषी विभागाने तीन लाख रुपये किमतीचे बोगस खत जप्त केले. या प्रकरणी एका व्यक्तीसह कंपनीविरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्वे शिवारात एकजण बोगस खते विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली असता सायसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये खतांच्या गोण्या आढळून आल्या, त्यांची तपासणी केली असता संबंधित खत हे बोगस असल्याचे निदर्शनास आले.
एकुण १५० गोण्या खत जप्त करण्यात आले. त्याची किंमत तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. सायसिंग याच्याकडे खत विक्रीचा कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आले.
त्यानुसार सायसिंग राऊत व संबंधित कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम १९५५ व खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. ही कारवाई भरारी पथक प्रमुख किशोर हडपे कृषी विकास अधिकारी नंदुरबार स्वप्निल शेळके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नीलिमा वसावे यांनी केली.