तरुण भारत लाईव्ह । २७ फेब्रुवारी २०२३। फालुदा हा पदार्थ हा भारतामध्ये बहुतेक भागामध्ये खूप आवडीने खाल्ला जातो पण हा पदार्थ बाहेर जाऊन खातात पण फालुदा हा घरी करायला सुद्धा अतिशय सोप्प्पा आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
व्हॅनिला आईस्क्रिम, फालूदा शेव, गुलाबाचे सरबत, ताजे क्रीम, दूध, गुलाब इसेन्स, बदाम व पिस्ते, साखर
कृती
सर्वप्रथम दूधात साखर घालून दूध आटवून घ्या. थंड झाल्यावर त्यात गुलाब इसेन्स घाला आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा सर्व्ह करतांना आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत, मग फालूदा शेवया, नंतर त्यावर गार केलेले दूध घाला. नंतर व्हॅनिला आईस्क्रिम घालून त्यावर क्रीम घालून वर बदाम पिस्ते घालून सजवा. यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेन्स घालून फालुदा सर्व्ह करा.