तरुण भारत लाईव्ह ।१५ मार्च २०२३। प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते समीर खक्कर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समीर खक्कर 80 च्या दशकात दूरदर्शनच्या लोकप्रिय मालिका नुक्कड मध्ये ‘खोपडी’ या मद्यपीची अतिशय प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखले जात होते.
सूत्रानुसार, समीर खक्कर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. काल दुपारी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे ते बेशुद्ध झाले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आज पहाटे ४.३० वाजता त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. बोरिवलीतील बाभाई नाका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
समीर यांनी मनोरंजन, सर्कस सारख्या मालिकांमध्येही काम केले. समीर यांनी ‘परिंदा’, ‘ईना मीना डीका’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’, ‘आतंक ही आतंक’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अव्वल नंबर’, ‘प्यार दीवाना होता है’, ‘हम हैं कमाल के’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या