---Advertisement---

सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

---Advertisement---

कर्जत : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कर्जतच्या एन डी स्टुडिओतच त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले.

१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘परिंदा’,’डॉन’,’लगान’, ‘देवदास’,’जोधा अकबर’,’हम दिल दे चुके नम’ अशा अनेक भव्य सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं. तर ‘बालगंधर्व’ सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले.

वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठं नाव. 2005 साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य ‘एनडी स्टुडिओ’ त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केलं होतं.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---