---Advertisement---
जळगाव : जिल्हयातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खटल्याचे कामकाज सुरू असताना कक्षात बेंचवर बसलेल्या आरोपीच्या डोक्यावर छतावरील पंखा पडला. ही जामनेर घटना येथील न्यायालयात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सुदैवाने आरोपीला डोक्यावर किरकोळ मुका मारल्याने अनर्थ टळला.
दिनेश सुरजमल तेली (वाकी, ता. जामनेर) असे या जखमी आरोपीचे नाव आहे. न्यायाधीशांसमोर खटल्यातील साक्षीदाराची साक्ष सुरू होती. अॅड. पी. के. पाटील हे या साक्षीदाराची उलटतपासणी घेत असताना हा प्रकार घडला. जखमी तेली यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
---Advertisement---
न्यायालयाची इमारत सुमारे ५० वर्षापूर्वी बांधली असून काही भाग जीर्ण झाल्याने नवीन इमारत बांधण्याबाबत वकील संघाकडून ठराव केल्याचे सांगण्यात आले. वकिलांची वाढती संख्या व खटल्यांचे कामकाजदेखील वाढल्याने सध्याची इमारत कमी पडत असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.
माता-पित्याला निर्वाह भत्ता न दिल्याने मुलावर गुन्हा दाखल
धुळे : चाळीसगाव रोड परिसरातील माता-पित्याला दरमहा पाच हजार रुपयांचा निर्वाह भत्ता न दिल्यामुळे मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आदेश देऊनही मलाने त्याचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अब्दुल रऊफ करीम मुजावर (वय ७१, रा. धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलिसात यासंदर्भात तकार दिली आहे. अब्दुल रऊफ मुजावर यांनी २५ जानेवारी २०२४ रोजी न्यायालयात अर्ज केला होता. मुलगा अब्दुल मकार अब्दुल रऊफ मुजावर (वय ४२) याला दरमहा पाच हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणन वडील अब्दुल रऊफ मुजावर आणि त्यांच्या पत्नीला देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाचा आदेश होऊनही मुलाने आजपर्यंत माता-पित्यांना निर्वाह भत्त्याची रक्कम दिलेली नाही.